वसमत: कार्य दर्पण youtube व महाराष्ट्र लोक कल्याणकारी संस्था नवीन पनवेल नवी मुंबई. यांनी राष्ट्रीय कार्य दर्पण गौरव संमेलन सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग आणि समाजाभिमुख कामगिरी बद्दल त्यांना संस्थेकडून गौरविण्यात आले आहे,त्यामध्ये महाराष्ट्रातील वसमत जिल्हा हिंगोली, दैनिक गावालाचे जेष्ठ कवी लेखक गीतकार अभिनेता शाहीर गायक नाट्यकलावंत श्री अहमद पिरनसाहब साहब शेख यांना दिनांक 13.6.2026 रोजी सीएसएमटी पत्रकार भवन मुंबई येथे, राष्ट्रीय कलादर्पण सन्मान पुरस्कारा देऊन सन्मानचिन्ह ट्रॉफी सन्मानपत्र शाल देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री शेख अहमद यांना यापूर्वीही 2025 मध्ये 19 साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्याबद्दल दैनिक गाववाला कवी शायर मंच,व शुभचिंतक मित्र परिवाराकडून अभिनंदन.

