Thursday, February 26, 2026
Homeबारामतीभाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा इंदापूर ला येतील, ...

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा इंदापूर ला येतील, एड शरद जामदार ,

प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकी आगोदर पासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी काम करीत आहे, इंदापूर ची जागा ही शिवसेना, भाजप युतीमध्ये भाजप कडे आहे व आगामी निवडणुकीत भाजप कडे राहणार हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे , त्या मुळे आगामी निवडणुकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूर मध्ये येतील , असे प्रत्युत्त इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ऍड शरद जामदार यांनी मंगळवारी दिलेते म्हणाले राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीचे गतिमान सरकार एक वर्षा पासून बहुमताने कार्यरत आहे ,या शिवसेना भाजप सरकार मध्ये येऊन अजितदादा पवार हे सहभागी झाले असुन शिवसेना भाजप ने त्यांना उपमुख्यमंत्री पद व त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्री पद दिले आहेत त्या मुळे इंदापूर ची जागा ही शिवसेना भाजप युतीकडे म्हणजे भाजपकडे राहणार असून हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा इंदापूर ला येतील असे भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार यांनी स्पष्ट केले , राष्ट्रवादी च्या इंदापूर तालुका अध्यक्षस्थानी विधाने करण्या आगोदर ते अजित पवार यांच्या पक्षाबरोबर आहेत की जेष्ठ नेते शरद पवार, सुप्रियाताई सुळेयांच्या बरोबर आहेत का जाहीर करावे लागते ,असा सल्लाही एड शरद जामदार यांनी दिला,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments