प्रतिनिधी प्रशांत सोनवणे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मा सुनील महाडिक यांची बदली करण्यात आली आहे या आधीच्या बारामती शहर पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस निरीक्षकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात आली होती त्यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून सुनील महाडिक यांची नेमणूक करण्यात आली होती मात्र निष्कलंकित महाडिक साहेब यांची बदली झाल्याने एकूणच त्याचा सर्व कारभार वर बारामतीकरानी समाधान व्यक्त केले आहे , राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारामती शहरात महत्वाच्या सर्व प्रशासकीय कार्यालयात गेल्या काहीदिवसांपासून प्रभारी अधिकारीच काम पहात आहेत त्यामुळे प्रशासनावर पकड असलेल्या अजितदादांच्या बारामती , बारामतीला हक्काचे अधिकारी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे , या प्रभारी अधिकाऱ्यापैकी एक असलेले सुनील महाडिक साहेब यांची बदली झाल्याने आता इतर प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार का या कडे लक्ष राहीले आहे

