पर्यावरण शास्त्राच्या *विभाग प्रमुख* सौ *डॉ विजयालक्ष्मी राजीव शिंदे* (अबेदा इनामदार सीनियर कॉलेज कॅम्प, पुणे) यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच पर्यावरणशास्त्रातील *पी.एचडी.* जाहीर झाली. त्यांचा संशोधन विषय हा ” इकॉलॉजिकल असेसमेंट ऑफ अर्बन ग्रीन स्पेसेस अँड इट्स पोटेन्शियल फोर प्रोवायडींग इकॉलॉजिकल सर्विसेस विथ स्पेशल रेफरन्स टू कार्बन सिक्वेस्ट्रेशन पोटेन्शिअल”.
यासाठी यांना *डॉक्टर ज्ञानेश्वर महाजन व डॉक्टर व्ही. आर. गुणाले सर आणि प्राचार्य डॉक्टर शैला बूटवाला* यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर घरातील स्मृतिगंध *शारदाताई अंबादास शिंदे व अंबादास सैदु शिंदे, डॉक्टर विजय दत्तात्रय महिंद्रकर व डॉक्टर शामला महिंद्रकर* यांचे अनमोल सहकार्य व आशीर्वाद लाभले.
यापूर्वी त्यांनी पर्यावरण विषयातच नैपुण्य प्राप्त करत त्यांनी एम. एस. सी.( M.Sc पर्यावरण शास्त्र) मध्ये *विद्यापीठात प्रथम क्रमांकाने* उत्तीर्ण झाल्या.
इतर शैक्षणिक प्राविण्य खालील प्रमाणे:
1)SET व UGC-NET
2)Diploma in Environmental Management and ISO 14000.( *पर्यावरण नियोजन व व्यवस्थापन* ISO-14000)
3) Diploma in Pollution Control.( *प्रदूषण नियंत्रण*)
4)Expert in Environmental Audit( *पर्यावरणातील लेखापरीक्षण*)
5) पर्यावरण शास्त्रातील *एम. फिल* डिग्री प्राप्त केलेले आहे.
6) पर्यावरण विषयासाठी *व्हीसी नॉमिनी* म्हणून *फर्ग्युसन कॉलेज* येथे नेमणूक करण्यात आली आहे.
7) पर्यावरण शास्त्रातील *5 पुस्तके* प्रकाशित.
8) पर्यावरण विषयावर *11 संशोधन पेपर* प्रकाशित.
9) आदर्श प्राध्यापिका म्हणून *सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने* सन्मानित.
*2014 मध्ये भारतातील *पर्यावरणासाठी स्वतंत्र विद्यापीठ* मागणी करणाऱ्या डॉक्टर विजयालक्ष्मी राजीव शिंदे या आहेत.
पर्यावरण विषयातील पीएचडी प्राप्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तसेच *चैतन्य हास्ययोग धानोरी* यांच्यातर्फे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.

