Thursday, February 26, 2026
Homeपुणेबारामती मध्ये कोणाच्या आशिर्वादाने होतो आहे गुटखा वितरित ❓

बारामती मध्ये कोणाच्या आशिर्वादाने होतो आहे गुटखा वितरित ❓

मुकनायक बारामती तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे

महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केली असताना काही दिवसांपूर्वी ४८ लाख रुपयांचा गुटखा बारामती पोलिसांनी कारवाई मध्ये जप्त केला आहे. परंतु येवढी मोठी कारवाई होऊन ही बारामती शहर परिसरातील अशोक नगर, निरा रोड , तांदुळवाडी, येथील गुटखा व्यावसायिक सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत वडा पाव, चहा स्टॉल, पान शॉप, किराणा दुकान या व्यावसायिकांना त्यांच्या धंद्याच्या ठिकाणी किंवा त्यांच्या घरी जाऊन गुटखा पोहच करत आहे या फेरीवाल्यां वर पोलीसनी कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज दिनांक ८/६/२०२३ रोजी पुणे जिल्हा ग्रामीण अधिक्षक मा. अंकितजी गोयल साहेब यांना बारामती चे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. गणेशजी इंगळे साहेब यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे बारामती शहर पोलिस स्टेशन तसेच बारामती तालुका पोलिस स्टेशन मध्ये हि निवेदन देण्यात आले. त्या वेळी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव मा प्रशांत विष्णू सोनवणे, गणेश चव्हाण पुणे जिल्हा युवा अध्यक्ष मा गणेश भोसले पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा शिकिदा भोसले बारामती तालुका महासचिव उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments