Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवड*नेहरूनगर येथील शाळेची नविन इमारत राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांच्या पाठपूराव्यातून..*

*नेहरूनगर येथील शाळेची नविन इमारत राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांच्या पाठपूराव्यातून..*

(वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे) पिंपरी चिंचवड प्रभाग क्र 9 मध्ये, नेहरूनगर मधील महानगरपालिकेचे शाळा संकूल येथील एक ईमारत धोकादायक झाली होती, खूप जूनी झाली होती, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेवून येथील मा. नगरसेवक व विरोधी पक्षनेते श्री. राहूल भोसले, मा. नगरसेवक श्री. समिर मासूळकर, मा. नगरसेविका सौ. वैशाली घोडेकर, मा. नगरसेविका सौ. गिता मंचरकर या चारही नगरसेवकांनी पाठपुरावा करून त्या ईमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले व ईमारत धोकादायक असल्याने त्याला पाडण्याचा ठराव केला. आणि ती जुनी ईमारत पाडून त्याठिकाणी नवीन सर्व सोयी युक्त अशी अत्याधुनिक ईमारत निर्माण होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पालिकेकडून निधी घेतला, ईमारतीचे डिझाईन फायनल केले. ईमारत उभारताना बारिक बारिक गोष्टींकडे लक्ष दिले, व आज रोजी नेहरूनगर व आजूबाजूच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही नवीन सुंदर शाळा ईमारत उभी झाली, आज महापालिकेत प्रशासक राजवट आहे, अशात प्रशासन हिंदीतील या म्हणी प्रमाणे वागताना दिसते आहे. “मेहनत करे मूर्गी और अंडा खाये फकिर” त्यामुळे उदघाटन कोणाच्या हस्ते होणार, श्रेय कोण घेणार यापेक्षा ह्या नवीन शाळा उभारणीचे संपूर्ण श्रेय व मेहनत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चारही नगरसेवकांची आहे, आणि हेच सत्य आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments