वसमत (प्रतिनिधी) आळणे मिलिंद
श्रावस्ती नगरशहरातील कारखाना रोडवरील श्रावस्ती नगर येथील जेतवन बुद्ध विहारामध्ये १ मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती (वैशाख पौर्णिमा) अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बुद्ध विहाराच्या पुढील बांधकामासाठी संकल्प करण्यात आला.त्रिविध पावन दिनाचे औचित्यवैशाख पौर्णिमा हा दिवस भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तीनही घटनांनी पावन झालेला दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवदीक्षितांना बुद्ध पौर्णिमा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आवाहन केले होते. याच परंपरेचे जतन करत वसमतमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर उपस्थित अनुयायांनी सामूहिक त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध वंदना घेतली.बांधकामासाठी योगदानाचे आवाहनश्रावस्ती नगर येथील जेतवन बुद्ध विहाराच्या बांधकामाचा पहिला टप्पा उपासक-उपासिकांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात होत असून, विहाराचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी परिसरातील श्रद्धावान उपासकांनी आपल्या इच्छेप्रमाणे स्वेच्छेने योगदान द्यावे, असे आवाहन प्रमुख मान्यवर व विहार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या मंगलमयी सोहळ्याला परिसरातील बौद्ध अनुयायी, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जेतवन बुद्ध विहाराच्या माध्यमातून सामाजिक आणि धम्म क्रांतीचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असा सूर या कार्यक्रमातून उमटला.

