Thursday, June 11, 2026
Homeदौंडदौंड शहर भारतीय बौद्ध महासभा तसेच बुद्ध धम्म सेवा संघ दौंड यांच्या...

दौंड शहर भारतीय बौद्ध महासभा तसेच बुद्ध धम्म सेवा संघ दौंड यांच्या विद्यामाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी. जयंती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी: विजय बगाडे

दौंड-भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर तसेच बुद्ध धम्म सेवा संघ विद्यामाने विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये १४ एप्रिल सकाळी १० वा. मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमता विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच समता सैनिक दल यांची कडून विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना सलामी देण्यात आली तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले दिनांक ०४ एप्रिल पासून ते १४ एप्रिल पर्यंत भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर मध्ये विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले गायक संतोष माने यांच्या वाद्यवृंदासह लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रबोधन व गाणे घेण्यात आले तसेच प्रमुख उपस्थिती आयु. भीमराव घाटे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पुर्व अध्यक्ष आयु. संतोष आरवडे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व आयु.श्रीकांत साळवे भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष. सदस्य कार्यकारिणी आयु. पी. एम. कापुरे आयु. श्रीकांत शिंदे (बौद्ध धम्म सेवा संघ दौंड) आयु. डॉ. किरण जाधव आयु. गणेश ओव्हाळ आयु.देविदास शिंदे आयु. संदीप कांबळे आयु.कैलास जगताप आयु. शिवराम लोंढे आयु. चंद्रकांत गालफाडे आयु. संतोष म्हस्के आयु. अरुण जाधव व अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतक सर्व कार्यक्रमास उपस्थिती होते. १४ एप्रिल जयंतीच्या निमित्ताने आनंद उत्सवात सर्वांनी सहभाग होता जयंती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला

- Advertisment -

Most Popular

Recent Comments