ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी शैक्षणिक झेप; डॉ. विजय पाटील, आदित्य मोडक व त्यांचे पिताश्री वामन मोडक यांचे हस्ते उद्घाटन
येळवी/प्रतिनिधी.
अभिजीत लांडगे
जत तालुक्यातील येळवी येथे अनंतजी अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर आश्रम शाळा येळवी येथे आधुनिक व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज निवासी वस्तीगृहाच्या इमारतीचे भव्य भूमिपूजन समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असून, या उपक्रमामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे.
भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील,आदित्यजी मोडक व आदित्यजी मोडक यांचे पिताश्री वामन मोडक यांच्या हस्ते या वस्तीगृहाच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर आश्रम शाळा येळवी ही शाळा परिसरातील गोरगरीब, विशेषतः ऊसतोड मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर, तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत असून शाळेचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.
या कार्यक्रमात बोलताना आदित्यजी मोडक यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित व सुसज्ज निवासी सुविधा मिळणे ही काळाची गरज आहे. या वस्तीगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होईल.” त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये सकारात्मक उत्साह निर्माण झाला.
यावेळी संजय वजरेकर सर यांनीही आपल्या मनोगतात अनंतजी अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच खरी समाजसेवा असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकल्पांची गरज अधोरेखित केली. या वस्तीगृह उभारणीसाठी संजय वजरेकर सर व प्रा. अनिल देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा उपक्रम साकारत असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गारांतून नमूद केले.
उभारण्यात येणारे हे वस्तीगृह अत्याधुनिक सुविधा, सुरक्षित निवास, स्वच्छ व सुसज्ज परिसर, अभ्यासासाठी योग्य वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक अशा सोयींनी परिपूर्ण असणार आहे. त्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हे वस्तीगृह खऱ्या अर्थाने “ज्ञानमंदिर” ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित :
संस्थेचे सचिव डॉ. शिवगोंडा पाटील, संचालक भाऊराया पाटील, रुद्रगौडा पाटील, संतोष पाटील व सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य एम. एस. पाटील, श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूलचे प्राचार्य नंदकुमार खंडागळे, पंचायत समिती सदस्य विजय रूपनुर, पत्रकार मारुती मदने, सुनील पतंगे, संतोष पोरे, विरूपाक्ष येवले, सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे, विठ्ठल यादव,शिक्षक तानाजी पवार, माजी मुख्याध्यापक शहाजी शिंदे, मुख्याध्यापक राजू कडीमाळी, सचिन व्हणमाने, तमान्ना मासाळ, अधीक्षक रमेश कट्टे, मुख्याध्यापक धानप्पा मनगुळी, संपत खवेकर, भगवान देशपांडे गुरुजी, मुकुंद पाठक गुरुजी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गंगाप्पा तेली. अभिजित लांडगे.विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश बाबानगर यांनी केले. सूत्रसंचालन अतुल गडदे व अपरीन मनियार यांनी केले, तर आभार धनाजी कुलाळ यांनी मानले.कार्यक्रमानंतर
उपस्थित,मान्यवर, पालक व विद्यार्थी यांना उत्कृष्ट असे स्नेहभोजन देण्यात आले.

