Friday, April 17, 2026
Homeदौंडमहाड चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानव मुक्तीचा संघर्ष होता. - बी....

महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानव मुक्तीचा संघर्ष होता. – बी. वाय. जगताप

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड-२० मार्च हा चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेमुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो चवदार तळे हे महाड येथे असलेले पाण्याचे तळे आहे त्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक तळे असताना विशेषतः पाणी पिण्यासाठी बंदी होती २० मार्च १९२७ या दिवशी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हजारो अनुयायांसह महाड चवदार तळे खुले केले जगातील पाण्यासाठी पहिले सत्याग्रह मोठे आंदोलन केले. त्याच अनुषंगाने २० मार्च दिन दिवस दौंड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला.

विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व २० मार्च १९२० रोजी बहिस्कृत हितकरिनी सभा महाड येथे घेतली .मुंबई ब्रिटिश कौन्सिल सदस्य सी.के.बोले यांनी सर्व पिण्याचे पाणवठे आस्पृशा साठी खुले करणेचा ठराव कौन्सिल मध्ये मंजूर केला होता.त्याची अंमलबजावणी महाड येथे करणे व सर्व दलितांना आत्मसन्मान मिळवून देणे यासाठी ही परिषद होती.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अस्पृशाणा इतर समाजा प्रमाणे सामाजिक शैक्षणिक दर्जा मिळाला पाहिजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाड येथे म्हटले होते असे विचार बी. वाय. जगताप यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक दौंड येथे व्यक्त केले.

बुद्दिष्ट नालंदा बहुउद्देशिय प्रतिष्ठान भोईटे नगर यांचे वतीने कार्यक्रम संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भीमराव मोरे यांनी ही समुचीत विचार व्यक्त केले.सामुदायिक धम्म वंदना झाली.या कार्यक्रमास सूर्यकांत जानराव,शंकर सोनवणे, सै दप्पा गायकवाड,के.के.खांडिझोड,दिलीप अडव,राजू कांबळे,सुर्यवंशी,बनसोडे इत्यादी मान्यवर हजर होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments