Friday, April 17, 2026
Homeमहाराष्ट्रऑल इंडिया कॉन्फरन्स संघटनेच्या राष्ट्रीय सेक्रेटरी पदी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र...

ऑल इंडिया कॉन्फरन्स संघटनेच्या राष्ट्रीय सेक्रेटरी पदी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे यांची नियुक्ती.

मूकनायक/अमोल भालेराव
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.

नवी दिल्ली आज दिनांक 16 मार्च 2026 सोमवार रोजी नवी दिल्ली येथील हॉटेल ताज येथे ऑल इंडिया कॉन्फरन्स ची राष्ट्रीय बैठक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष छत्तीसगढचे माजी राज्यपाल के.एम.सेठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली..

या बैठकीत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची राष्ट्रीय सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली तसेच सिंगापूर येथे संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली..

अनिल भाई गांगुर्डे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल अनेक मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या..

याप्रसंगी उत्तराखंडचे कायदा मंत्री राजेश टंडन,भारत सरकारचे पूर्व सचिव एन दिवान,इंफाळचे व्हाईस चान्सलर अब्दुल अफरोजल,राष्ट्रीय महासचिव ऍड. प्रकाश निधी शर्मा,ऍड. हरिशंकर शर्मा,बापूसाहेब गायकवाड, ऍड.अमित नलावडे, दिल्लीचे युवा नेते सत्यप्रकाश कर्दम,युवा नेते प्रशांत गांगुर्डे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!

- Advertisment -

Most Popular

Recent Comments