Saturday, March 14, 2026
Homeदौंडस्रीयांचा सन्मान प्रत्यकाने करावा - बी. वा य.जगताप

स्रीयांचा सन्मान प्रत्यकाने करावा – बी. वा य.जगताप

मूकनायक दौंड ता. प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड – ८ मार्च विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस जगभरातील महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी साजरा केला जातो भारतीय संविधानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वाचे अधिकार आणि संरक्षण दिले आहेत हे अधिकार महिलांना समानता सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा साठी मदत करतात ८ मार्च महिला दिनानिमित्त दौंड मध्ये नालंदा बुद्ध विहार येथे महिला दिन साजरा करण्यात आला.

अमेरिकेतील न्यूयार्क शहरात ८ मार्च १९०८ साली सुमारे १५००० स्री या क्लारा झेटिन्ग यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आम्हाला कामांचे ठिकाणी संरक्षण पाहिजे,कामाचे तास कमी करा , पुरुषा प्रमाणे पगार द्या व मतदानाचा अधिकार द्या.या रस्त मागण्या होत्या.व त्या यू नो मध्ये मान्य झाल्या व त्यांना सन्मान मिळाला म्हणून आजही आपण दरेकाणे स्त्रीयांचा सन्मान केला पाहिजे असे विचार बी.वाय. जगताप माजी शिक्षण अधिकारी यांनी दौंड मधील नालंदा बुध्द विहार येथे व्यक्त केले.

बुध्दीस्ट नालंदा बहुउद्धेसिय प्रतिष्ठान भोईटे नगर दौंड यांचे वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन संपंन्न झाला.अध्यक्ष स्थानी प्रा .डॉ.भीमराव मोरे होते.सामुदायिक धम्म वंदना झाली.व धम्मसभा झाली.कार्यक्रमाला आयु.गोरख घोडके,राजू कांबळे,के.के.खंडी झोड,सूर्यकांत जानराव ,दिलीप सूर्वासे सुरेखा जानराव,सैदाप्पा गायकवाड,सुरेखा गोरख घोडके आयु. सुर्यवंशी इत्यादी उपासक उपसीका हजर होत्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments