Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रवणी पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा,वणी परिसरातील विविध क्षेत्रातील महिलांचा...

वणी पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा,वणी परिसरातील विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी सन्मान.

मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ( नाशिक ग्रामीण ) वणी पोलिस ठाण्यात एक विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.वणी पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनी) गायत्री जाधव यांच्या पुढाकाराने परिसरातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसोबत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिक्षण,राजकारण,सामाजिक कार्य,आरोग्य,महिला बचत गट तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.या प्रसंगी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या,अनुभव आणि समाजातील तळागाळातील महिलांच्या समस्या आणि भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.गायत्री जाधव यांनी वणी तील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अवघ्या चोवीस तासासांत अटक करून महिला वर्गात एक सुरक्षितेचा संदेश दिल्या बद्दल त्यांचे यावेळी उपस्थित महीलांकडून बबिता गांगुर्डे यांच्या कडून ( उलगुलान प्राथमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ) कौतुक करण्यात आले.देशात महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून सर्व समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत सपोनी गायत्री जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच कायद्याविषयी जागरूक राहावे,असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.दरम्यान,सपोनी गायत्री जाधव यांनी पुढाकार घेऊन आयोजीत केलेल्या या उपक्रमाचे वणीकरांकडून स्वागत करण्यात येत असून सपोनी गायत्री जाधव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments