मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.
दिंडोरी तालुक्यात आझाद समाज पार्टी चा झंजावात सुरू असून,साहिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी वेगाने होत असल्याचे चित्र दिसत आहे.गाव तेथे पक्षाची शाखा या उपक्रमा अंतर्गत वरखेडा,परमोरी, लखमापूर फाटा येथे साहिल सोनवणे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन करण्यात आले.साहिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात विविध गावांमध्ये बैठका,सभां व जनसंपर्क मोहिमा राबवून पक्षाचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.
साहिल सोनवणे यांनी युवकांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी जोडण्यावर विशेष भर दिला आहे. “सामाजिक न्याय,शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडून जनतेचा विश्वास संपादन करू,” असे त्यांनी लखमापूर फाटा शाखा उद्घाटन प्रसंगी सांगितले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील अनेक तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश घेत सक्रिय झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत दिंडोरी तालुक्यातील विविध भागांत पक्षबांधणी करिता आयोजित बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,येत्या काळात गण आणि गट यात मोठ्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनी दिली. त्यामुळे दिंडोरी तालुक्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.स्थानिक पातळीवर साहिल सोनवणे यांच्या नव्या नेतृत्वामुळे पक्षाला बळ मिळत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.प्रमुख उपस्थितांमध्ये युवा प्रभारी अमोल आहेर,युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विजय मोरे,नाशिक शहराध्यक्ष मनोज हिरे, दिंडोरी तालुकाध्यक्ष वैभव शार्दुल, उपअध्यक्ष अजित बर्डे तालुका कार्यअध्यक्ष स्वप्नील गांगुर्डे तालुका संघटक तुषार साळवे तालुका सपंर्क प्रमुख फैजान मनियार तालुका सचिव कृष्णा जगताप तालुका प्रसिद्ध प्रमुख किशोर शेळके वणी शहर अध्यक्ष प्रफुल केदारे तालुका सचिव तीरुपती गांगुर्डे वरखेडा शाखा अध्यक्ष संतोष निकम दत्तु कडाळे रोहित डंबाळे ओम गांगुर्डे राहुल गागुर्डे मुन्ना गांगुर्डे कुंदन गांगुर्डे लखमापुर फाटा अध्यक्ष प्रज्वल गांगुर्डे विवेक बागुल विवेक पवार विजय सोनवाने समाधान सोनवाने सिध्दार्थ सोनवने मनोज कावळे राकेश साळवे आदी उपस्थित होते
यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

