कराड:- ता.19 वचित बहुजन आघाडी कराड शहर तसेच कराड दक्षिणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यकर्तेसकाळी 10.30 वाजता बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पदाधिकारी जमा झाले बाबासाहेबांना अभिवादन करून कार्यकर्ते बाईक रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुतळा परिसरात उपस्थित राहुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले याप्रसंगी जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच तालुक्याचे नव नियुक्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कराड शहर चे संतोष बोलके यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांनी जसे 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी कार्य करत आहे
याप्रसंगी नव नियुक्त पदाधिकारी मा. दिपक कांबळे ,भागवत कांबळे , जिल्हा पदाधिकारी प्रशांत थोरवडे, साहेबराव लोखंडे, विकास मस्के , तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन झिमरे ,विजय अडसूळे ,मिलिंद सावंत ,विजय सोनवणे ,तुकाराम वाघमारे, राहूल थोरवडे व अनेक कार्यकर्त यावेळी उपस्थित होते

