कराड:- ता.19 वचित बहुजन आघाडी कराड शहर तसेच दक्षिणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 व्या जयंती मोठ्या निमित्त वंचितचे पदाधिकारी व सभासद डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्साहात साजरी करण्यात आली
सकाळी 10.30 वाजता बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पदाधिकारी जमा झाले बाबासाहेबांना अभिवादन करून कार्यकर्ते बाईक रॅलीने बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन केले याप्रसंगी जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच तालुक्याचे नव नियुक्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कराड शहर चे संतोष बोलके यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांनी जसे 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी कार्य करत आहे
याप्रसंगी नव नियुक्त पदाधिकारी मा. दिपक कांबळे ,भागवत कांबळे , जिल्हा पदाधिकारी प्रशांत थोरवडे, साहेबराव लोखंडे, विकास मस्के , तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन झिमरे ,विजय अडसूळे ,मिलिंद सावंत ,विजय सोनवणे ,तुकाराम वाघमारे, राहूल थोरवडे व अनेक कार्यकर्त यावेळी उपस्थित होते

