Thursday, February 26, 2026
Homeनाशिकछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आझाद समाज पार्टी कडून लखमापूर येथे...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आझाद समाज पार्टी कडून लखमापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

मूकनायक नाशिक जिल्हा प्रतिनिधी/अमोल भालेराव

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे शिवजयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील उभरते युवा आंबेडकरी नेतृत्व आझाद समाज पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला तालुक्यातील सर्वधर्मीय तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ९००० मिली रक्त यावेळी संकलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.सकाळपासूनच जिल्हा परिषद शाळा येथे रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. युवक-युवतींसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी यावेळी जपली.
यावेळी साहिल सोनवणे यांनी सांगितले की, “शिवजयंती केवळ उत्सव न राहता समाजासाठी उपयुक्त कार्य घडावे,या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.संकलित रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आझाद समाज पार्टी दिंडोरी तालुका कार्यकारिणी सह स्थानिक स्वयंसेवक,वैद्यकीय पथक,पोलिस बांधव यांचे सह विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले.शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक जाणीव आणि ऐक्याची भावना दृढ झाल्याचे मत शिवसेना (शिंदे) गटाचे तालुका प्रमुख अमोल कदम,यांनी व्यक्त केले.त्यांच्या सह अतुल गायकवाड व त्यांचा सर्व सहकाऱ्यांनी उपस्थिती व सहभाग नोंदवला.यावेळी शरद मोगल,राजू देशमुख,लहानू पाटील,पंडित जाधव ,साजन पगारे,वैभव शार्दुल,अजित बर्डे,स्वप्नील गांगुर्डे ,तुषार साळवे,बापूसाहेब देशमुख,सनी खरोटे,निखिल जाधव,समधान सोनवणे,सिद्धार्थ सोनवणे,लक्ष्मीकांत पवार,विकी शेवाळे,ऋतिक आहेर,समधान बोराडे,चंदन आहेर,प्रज्वल सोनवणे,सैरब सोनवणे,संकेत सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते रविराज सोनवणे,लखमापूरच्या माजी सरपंच वर्षाताई सोनवणे,संजना बोराडे,जोती जाधव,दीपा अहिरे,मीनाबाई साठे,कणिक्षा पवार,जुई सोनवणे,श्रद्धा गाडे…आदी उपस्थित होते.

.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments