वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद
वसमत: भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संबोधी बुद्ध विहार, हर्षनगर वसमत येथे ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आणि रामजी बाबा आंबेडकर व सयाजीराव गायकवाड महाराज यांचा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले . बौद्धाचार्य दौलतराव गजभार यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेतली .
याप्रसंगी ॲड. रणधीर तेलगोटे यांनी माता रमाईंच्या त्यागावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “रमाईंनी स्वतःचे दुःख बाजूला सारून बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही. त्यांच्या या अजोड त्यागामुळेच जागतिक इतिहास घडला.” यावेळी त्यांनी युवकांना आवाहन केले की, प्रगतीसाठी लष्कर आणि पोलीस दलात भरती होणे काळाची गरज आहे. देशाच्या आणि समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या मुलांनी या विभागांत सहभागी व्हावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. रघुपती सरोदे हे म्हणाले की रामाजी बाबा व सयाजीराव गायकवाड हे डॉ बाबासाहेबांचे शिल्पकार असून या देशाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आहेत तरशोषित पिडित जनतेचे कैवारी आहे . नामदेव इंगोले यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला . या अध्यक्षीय समारोप बालाजी मोरे यांनी केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त ग्रंथवाल भगवान सोनकांबळे यांनी केले तर आभार साहेबराव सरोदे यांनी मानले या कार्यक्रमाला खंडोजी पंडित , मेजर भगवान सुर्यतळ, भिमराव शेळके, डॉ नामदेव मुळे, मनोहरे सर , यादव चौरे , दै . सम्राटचे अनिल पंडित , बार्टीचे मिलिंद आळणे, गाडेसर, आर एस नंद, संभाजी कस्बे, शारशंकर , उत्तम धायजे, कदम व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

