Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरछत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ऐतिहासिक किल्ले पारगड येथून वंचित बहुजन आघाडीच्या...

छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ऐतिहासिक किल्ले पारगड येथून वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा सुभारंभ

चंदगड : सध्या सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून चंदगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जि. प. व पं. स च्या निवडणूक रिंगणात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती चंदगड मधील अडकुर गण मधून आयु. अंकुश गोपाळ कांबळे (करंजगांव) व हेरे गण मधून सौ. मिनाक्षी मनोहर कांबळे (पारगड) असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले पारगड येथून छत्रपती शिवाजी महाराज व सुभेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा सुभारंभ केला असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारास जण माणसातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments