छ. संभाजीनगर : 14 जानेवारी 2026 33 व्या नामविस्तार दिनानिमित्त यश सिद्धी बहुउद्देशीय असोसीएशन कोर टिम व शाखा छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर मध्ये शहीद झालेल्या भिम सैनिकांना शहीद स्तंभास पोलीस सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महिला मिलींद शाक्य संघ व समता सैनिक दलाच्या वतीने सैनिकी शिस्तबद्ध पद्धतीने आदरांजली व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विद्यापीठ गेट समोर महार गान व राष्ट्रगीता सह सामुहिक मानवदना देण्यात आली .
येणाऱ्या भिम सैनिकांना फळ व नास्ता वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रम भिमा कोरगाव शौर्य स्तंभास सलामी प्रमाणेच करण्यात आला . 2025 मागील वर्षापासून आपण आपल्या संघटनेच्या वतीने सुरवात करण्यात आली . तसेच प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम अशाच प्रकारे घेण्यात येईल . दिनांक 15 जानेवारी रोजी शाखा छ संभाजी नगर तर्फे विद्यापीठ गेट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे . त्याबद्दल औरंगाबाद टिमचे कोर कमीटी तथे खूप खूप अभिनंदन .पूर्ण महाराष्ट्रात आपल्या संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तळागळापर्यंत पोहचवुन नागरीकांना जागृत करण्याचे काम करत आहे . पुढील मिशन चळदार तळे 20 मार्च महाड येथे घेण्यात येईल . जास्तीत जास्त महार रेजिमेंट सैनिक व इतर रेजीमेंटचे भिम सैनिक या कार्यक्रमात यावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे .

