वसमत :शहरातील संबोधी बुद्ध विहार हर्षनगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि २५ डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी मोरे हे होते तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ॲड रणधीर तेलगोटे , मेजर भगवान सुर्यतळ , रहुपती सरोदे आदी मान्यवर धम्म पीठावर उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बौद्धचार्य दौलतराव गजभार यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील वंदना घेतली . यावेळी ॲड रणधीर तेलगोटे यांनी सांगितले की . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी आणि त्यानंतर अतिशय घणघाती आपल्यावर त्यांच्या हजारो . वर्षापासून त्या चातुरवर्णीय आपल्यावर लादल्या गेल्या होत्या . शूद्र लोकांना आणि अतिशूद्रांना कोणतेही प्रकारच जीवन जगण्याचा अधिकार नव्हता गुराढोरांना मांनणारा कुत्र्यांना आधार होतात . झाडांना व प्राणीमात्रांना देव मानत होते पुजा करत होते पण माणसारखा माणूस असलेला त्यांच्या सारखा असलेला हात पाय , रक्त सारखे आहे अशा या मानवाला मात्र निर्बंध घातले होते . निर्बंध घालण्यात आले होते ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून तुम्हा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून निर्बंध हटविले . मेजर सुर्यतळ , रघुपती सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अध्यक्षीय समारोप बालाजी मोरे यांनी केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सोनकांबळे यांनी केले तर साहेबराव सरोदे यांनी आभार मानले . या कार्यक्रमास भिमराव शेळके, आर एस नंद , नामदेव इंगोले , दै सम्राटचे अनिल पंडित , बार्टीचे मिलिंद आळणे, यादव चौरे, संभाजी कस्बे आदी मान्यवर उपस्थित होते .

