कडेगांव :- दि. 20 डिसेंबर 2025 रोजी लोकनेते.मोहनराव कदम कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर अँड हॉर्टीकल्चर कडेगांव यांच्यामार्फत मोहिते वडगाव या गावी NSS कॅम्प लावण्यात आला होता.या उपक्रमा अंतर्गत चांगभलं फाऊंडेशन च्या ऍड.वैशाली सोनावले यांनी संविधान सत्र घेतले.
संविधान सत्रात ऍड.वैशाली सोनावले यांनी नियमांची गरज,प्रास्ताविकेचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध, विविध खेळाच्या माध्यमातून समजावून सांगितला.या सत्रास उत्तम प्रतिसाद नोंदवत एकूण 70 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.या उपक्रमाकरता डॉ वैभव चोपडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गावच्या महिला सरपंच शीतल मोहिते यांनी आपल्या कार्यक्रमाची प्रशंसा करून गावातील महिला तसेच शाळा कॉलेज मध्ये संविधान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यास आमंत्रित केले.त्याचबरोबर मोहिते वडगाव गावाचे ग्रामस्थ,विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग नोंदवला .

