वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद
वसमत: महाराष्ट्र शासना मार्फत संविधान जागर व घर घर संविधान या उपक्रम राबवित असुन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहय्य विभागची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे महासंचालक मा. श्री सुनील वारे साहेब समतादूत विमाग प्रमुख मा. बबन जोगदंड साहेब हिंगोली जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुकातील समतादूत आळणे मिलिंद, गुरुनाथ गाडेकर यांनी संविधान जागर या कार्यक्रमांतर्गत घर घर संविधान उपक्रमाच्या माध्यमातून तालुका वसमत येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय वसमत व कै. रमेश वरपूडकर माध्यमिक विद्यालय, जि प प्रा शाळा खाडेगाव या तिन्ही विद्यालयांमध्ये संविधान साक्षर या अभियाना मार्फत संविधान प्रश्नमंजुषा व निबध घेण्यात आली होती प्राचार्य मा.श्री.सावरे साहेब कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे सहशिक्षक आरे सर यांनी भारतीय संविधानाबद्दल प्रस्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे चार विभागांमध्ये ग्रुप पाडून त्यांना संविधानावरील प्रश्न विचारण्यात आले या प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धाकार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून चव्हाण सर हे होते हा कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडण्यासाठी बार्टी समतादूत मिलिंद आळणे सर व गुरुनाथ गाडेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडले या कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन गुरुनाथ गाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बार्टी समतादूत मिलींद आळणे सर यांनी केले.तर कै. रमेश वरपूडकर माध्यमिक विद्यालय, जि प प्रा शाळा खांडेगाव येथील शाळेतील कु.अंकिता उन्हाळे,कु.गौरी कुबडे,कु.मुक्ता पिसाळ,कु.निकीता कुसळे,कु.श्रावणी ढेंबरे,कु.ऋतुजा वाघमारे,कु.शिवकन्या आनेराव,समीक्षा तिम्मेवार श्री शिवेश्वर विद्यालयलय वसमत येथील मुख्याध्यापक श्री आर बी बलमखांबे आर.बी.यांच्या मार्गदर्शनाखाली कु.श्रद्धा संघरत्न वाघमारे, कु.सर्वज्ञा कैलास बौगळे,कु.तनुजा सुरेश मुधळ,श्वेता बालाजी हिवाळे आदी विद्यार्थी नीं संविधान उद्येशिका ट्राफी व मेडल देऊन सत्कार करण्यात आले.विदयार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

