कोल्हापूर/कराड, दि. १० डिसेंबर २०२५
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त कोल्हापूर येथील कावळा नाका ते मेरी वानलेस वैधकीय कॉलेज कॅम्पस या ठिकाणी जागतिक मानवाधिकार दिन उत्साहात साजरा केला सदर प्रसंगी प्रभात फेरी काढण्यात आली तसेच कराड येथील तारुख ग्रामपंचायत व विधी सेवा समिती यांचे संयुक्त विदयमाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कराड जिल्हा न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले.या प्रसंगी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश घुले सो. व पॅनल वरील विधीज्ञ उपसथित होते
कोल्हापूरच्या मेरी वानलेस वैधकीय महाविद्यालय हॉलमध्ये सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमाला नागरिक, वकील, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी, कराड जिल्हा न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समिती व ग्रामपंचायत तारुख येथील सभागृहात सकाळी दहा वाजता झालेल्या कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिलांना, शेतकऱ्यांना आणि युवकांना मानवाधिकारांबाबत जागृती करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी “प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे” या संकल्पनेवर भर दिला. कार्यक्रमात निबंध स्पर्धा, चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन केले. मानवाधिकारांचे महत्त्व, समता, स्वातंत्र्य आणि न्याय या तत्त्वांवर भाषणे झाली. तसेच, गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यात आला.
दोनही ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “मानवाधिकार हे फक्त कागदावरचे शब्द नसून, प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात उतरले पाहिजेत. त्यासाठी कायदेशीर सहाय्य समिती सदैव तत्पर आहे.”
बोधी फाऊंडेशन या संस्थेच्या व विधि सेवा समिती यांच्या सयुक्त कार्यक्रमांमुळे कोल्हापूर आणि कराड परिसरातील नागरिकांमध्ये मानवाधिकारांबाबत मोठी जागृती निर्माण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

