Thursday, February 26, 2026
Homeकराडदिवसेंदिवस कडक होत चाललेले कायदे म्हणजेच संस्कारांचा होत असलेला ऱ्हास- ऍड.भारत मोहिते...

दिवसेंदिवस कडक होत चाललेले कायदे म्हणजेच संस्कारांचा होत असलेला ऱ्हास- ऍड.भारत मोहिते .


भारती विद्यापीठ संचलित एमबीए कॉलेज मलकापूर येथे कायदेविषयक शिबिरामध्ये पोक्सो या विषयावर बोलताना ऍड भारत मोहिते म्हणाले, भारतासारख्या संस्कृती प्रधान देशात दिवसेंदिवस कडक होत असलेले कायदे म्हणजे,संस्कृती लोप पावत असलेली चिन्हे दिसत आहेत. लहान बालके ही प्रत्येक देशाचे भविष्य असते अशा बालकांचे संरक्षण करणे हे फक्त शासनाचे काम नसून ते प्रत्येक सुज्ञ भारतीय नागरिकाचे आहे. पोकसो कायद्या अंतर्गत आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये बचावाची संधी खूप कमी असते. या कायद्यामध्ये आरोपीला स्वतःवरील असणारे आरोप कसे खोटे आहेत हे सिद्ध करावे लागते या कारणामुळे सदर कायद्याअंतर्गत शिक्षेचे प्रमाण खूप आहे. तरी प्रत्येक युवा युवती नागरिकांनी कळत नकळत सुद्धा असे गुन्हे आपल्या हातून होऊ देऊ नयेत व दुसऱ्यालाही त्यापासून परावृत्त करावे. या कायद्यातील तरतुदी अतिशय कडक असल्याने या कायद्यात सापडलेल्या आरोपीला भविष्य उरत नाही. यावेळी या कायद्याअंतर्गत असलेल्या अनेक तरतुदी ऍड.मोहिते यांनी सांगितल्या. यावेळी कराड न्यायालयातील मा. न्यायाधीश उत्पात साहेब यांनी “रॅगिंग अॅक्ट “व “प्ली बार गैनिंग ” या विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच अशा कायदेविषयक शिबिरामधून प्रत्येकाने कायद्याचे जास्तीत जास्त ज्ञान घेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र करावा असे आव्हान उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग कर्मचारी यांना केले. यावेळी एमबीए कॉलेजचे प्राचार्य शेख सर यांनी कॉलेज अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दीपक थोरात यांनी केले. तसेच ऍड. किशोर जाधव यांनी मानव अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्राचार्य देशमुख सर, जगदाळे सर, पाटील सर, रसाळ सर, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल सोमवार दि. 29.9.2025 रोजी भारती विद्यापीठ संचलित एमबीए कॉलेज मलकापूर येथे पोक्सो या विषयावर बोलताना ऍड भारत मोहिते, माझे उजवीकडे,प्रा. पाटील सर, उपप्राचार्य देशमुख सर, प्रा. जगदाळे सर, प्राचार्य शेख सर, मा. न्यायाधीश उत्पात साहेब, कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दीपक थोरात व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग व सर्व स्टाफ.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments