Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रयापुढे गट विकास अधिकारी यांच चपल्यांचा हार घालुन करणार स्वागत.!*

यापुढे गट विकास अधिकारी यांच चपल्यांचा हार घालुन करणार स्वागत.!*

मूकनायक:- तालुका प्रतिनिधी प्रशांत नरवाडे
ता.कळमनुरी
गैरहजर,बेशिस्त *वागणाऱ्या गट विकास अधिकारी पंचायत समिती कळमनुरी यांच्या खुर्चीला बेशर्मिचे झाड़े* व पुष्पहार घालत वंचित *बहुजन आघाडीच्या वतीने नोंदविला जाहीर निषेध तसेच यापुढे गट* विकास अधिकारी यांना चपल्यांचा हार घालुन करणार स्वागत.!

तालुका *कळमनुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी हे सतत कार्यालयांमध्ये गैरहजर राहत* असतात,आज 14/02/2022 रोजी देखील काही कामास्तव गेले असता ग़ैरहजर *दिसले.नेहमीच कॉल न उचलने, सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी न लावणे,उड़वा उडविचे उत्तरे देने,सतत* बेशिस्तपणे कधीही कार्यालयामध्ये येणे कधीही ग़ैरहजर राहणे *मनमानी कारभार गेल्या अनेक दिवसांपासून करत आले आहेत.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वारंवार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे गट विकास अधिकारी यांची तक्रार* करून यागोदर नियमबाह्य बदल्या केल्या असुन त्यावर देखील कारवाई झालेली नाही असा मनमानी कारभार करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील आयकत *नाहीत.नियमचे पालन देखील करत नाहीत म्हणून या कारणास्तव सामान्य नागरिकांचे कामे होत नाहीत कोणतेही प्रश्न मार्गी लागत* नाहीत,नागरिक परेशान असून त्यामुळे अशा *बेशिस्त,बेजबाबदार गटविकास अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गट विकास अधिकारी यांच्या* खुर्चीला बेशर्मीचे झाडे व पुष्पहार लावत निषेद नोदविला.यापुढे अशा *बेजबाबदार गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई नाही झाली तर पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या* समस्त पदाधिकारी बसून लोकशाही पद्धतीने ठिय्या *आंदोलन करण्यात येईल तसेच गटविकास अधिकारी जिथे यापुढे दिसतील तिथे वंचित बहुजन आघाडी घेराव घालू चपल्यांचा हार घालून त्यांच् स्वागत* करेल असा ईशारा देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली राजू पाटिल यांनी वंचितच्या आजच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला.

यावेळी वंचितचे *तालुका महासचिव राजू कांबळे,आकाश मोगले* (ता.उपाध्यक्ष),चंद्रमुनि मोगले (ता. सद्यस्य),आंनद पाईकराव (शहर महासचिव),शंकर राऊत (शहर उपाध्यक्ष),युवा समाधान बलखंडे व इतर उपस्तित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments