Tuesday, September 29, 2026
Homeपिंपरी-चिंचवडकरिअर अवेरनेस प्रश्न मंजुषा स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची चमकदार कामगिरी

करिअर अवेरनेस प्रश्न मंजुषा स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलची चमकदार कामगिरी

हवेली प्रतिनिधी :रोहन सोनाळे

पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२२) नवी दिल्ली येथिल युनी अप्लाय करिअर अवरनेस या संस्थेने आयोजित केलेल्या प्रश्न’ मंजुषा स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत दिल्ली एनसीआर येथिल आणि महाराष्ट्रातील खासगी शाळांमधिल चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाचवी ते आठवी कनिष्ठ गट आणि नववी ते बारावी वरिष्ठ गट अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या. कनिष्ठ गटात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सुचेता रामपुरे प्रथम क्रमांक ; मानस सानप आणि प्रथमेश देवशातवार व्दितीय क्रमांक ; इशिका वाघ व्दितीय उपविजेता क्रमांक पटकाविला. वरिष्ठ गटामध्ये अमेय अजगर प्रथम क्रमांक आणि नेहा पाटील ने व्दितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा शिक्षण क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि पर्याय या संबंधित होत्या. विजेत्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा, समुपदेशक रीमा आंब्रे यांनी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे. उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव श्री.विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मुख्याध्यापक व शिक्षकाचे अभिनंदन केले.
————————————-

- Advertisment -

Most Popular

Recent Comments