Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडरिपब्लिकन सेनेच्या मागणीला यश.

रिपब्लिकन सेनेच्या मागणीला यश.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड ( पिं चिं )

दि,28 जानेवारी, पिंपरी : रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रभाग क्र 9 गांधीनगर प्रभागातील विविध नागरिक समस्या संधर्भात तिव्र आंदोलन करण्यात आले. यात ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा, आरोग्य आदी नागरिकांच्या समस्या महानगरपालिकेने मान्य केले व रिपब्लिकन सेनेच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.
यावेळी आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यात कार्याध्यक्ष मुकुंद रणदिवे, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नसीम शेख, मौलाना साहिवाद शेख, दत्ता गायकवाड, सचिव कांचन जावळे, उपाध्यक्ष गिरीश सोनवणे, सचिव केशव गायकवाड, तळवडे प्रभाग अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, संतोष सोनवणे, मेहबूब शेख तसेच गांधीनगर प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments