Thursday, February 26, 2026
Homeनाशिक७४ व्या प्रेरणा दिनानिमित्त 'मनमाड प्रेरणाभुमी' कृती समितीच्या लढ्याला 'यश सिद्धी आजी-माजी...

७४ व्या प्रेरणा दिनानिमित्त ‘मनमाड प्रेरणाभुमी’ कृती समितीच्या लढ्याला ‘यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य’कडून जाहीर समर्थन…!

‘मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन

प्रेरणाभुमी मनमाड, दि.१८ नोव्हेंबर.

नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगांव येथील मनमाड यां प्रेरणाभूमीत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून ‘अबेंडकर विद्यार्थी आश्रम’ उभारण्यात आले आहें. त्यावेळी या वास्तुचे भुमीपुजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दि.९ डिसेंबर १९४५ रोजी करण्यात आले होते तर १७ नोव्हेंबर १९५१ रोजी विद्यार्थी आश्रमचा लोकार्पण सोहळाहीं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच हस्ते प्रचंड लोकसमुदायाच्या उपस्थितीत साजरा झाला होता.

या वास्तुला १७ नोव्हेबर ‘मनमाड प्रेरणाभुमी’ म्हणून घोषित व्हावे या मागणीकरीता शासन स्तरावर प्रेरणाभुमी कृती समितीतर्फे लढा सुरू आहे…’मनमाड प्रेरणाभुमी’ कृती समितीच्या या लढ्यास ‘यश सिद्धी असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ यांचे जाहीर समर्थन आज याठिकाणी घोषित करण्यात आले…तत्पूर्वी प्रेरणाभुमी मनमाड कृती समितीचे अध्यक्ष रिटायर्ड एसीपी मा. दिलीप पगारे यांनी यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या रजिस्टर्ड संघटनेला प्रेरणाभुमीत ७४व्या प्रेरणा दिनानिमित्त यां पवित्र स्मृतीना उजाळा देण्याकरिता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केल्याने कोअर टिमचे पदाधिकारी उपस्थित झाले होते.

सदरील कार्यक्रमास यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशिय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यअध्यक्ष सुभेदार प्रदिप गायकवाड, उपाध्यक्ष शिवपूत्र घटकांबळे, सचिव कैलास खिल्लारे विधी सल्लागार ऍडवोकेट राजेन्द्र खोब्रागडे आणि सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातील संस्थापदाधिकारी, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

यां ७४व्या प्रेरणाभूमी सलामी कार्यक्रमास लॉर्ड गौतम बुद्ध सिरीयलमधिल तथागत सम्यक संबुद्धांची यथोचित भुमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेता व बौद्ध धम्म स्विकारून प्रचार प्रसार करणारे धम्म उपासक गगण मलिक हें प्रमुख अतिथी उपस्थित होते…

- Advertisment -

Most Popular

Recent Comments