Thursday, February 26, 2026
Homeदौंडमहात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे यश

महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे यश

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- हडपसर टाटा बिल्डिंग इंडिया महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गोंधळेनगर हडपसर येथील विद्यार्थी शालेय निबंध प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. आत्मनिर्भय भारत घडवण्यासाठी माझी भूमिका हा निबंध विद्यार्थ्यांना देण्यात आला होता या ऐनवेळी दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे विचार करून चिंतन करून निबंध लिहिला या स्पर्धेत प्रशालेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या 188 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दोन्ही स्पर्धेतील संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विजय बारकुल व उज्वला झांबरे अध्यक्षा शीलाताई साळुंखे सचिव अरविंद जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी गायत्री बनसोडे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक पवित्रा पांचाळ तृतीय शबनम शेख छोटा गटांमध्ये प्रथम सानिका करणे दुतीय वैभवी मलजी व तृतीय क्रमांक प्राचीन परमशेट्टी यांनाही बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली यावेळी रेखा काळभोर मॅडम ज्योती ससाने मॅडम अश्विनी महामुनी मॅडम शुभम हांडे सौरभ साळुंखे कोऑर्डिनेट म्हणून नागेश बोटे सर राजेंद्र ताकवलेसर सर. यावेळी कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप जगताप देखील उपस्थित होते .हा कार्यक्रम टाटा बिल्डिंग सागर शिंदे यांनी समारंभाचे आयोजन केले होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments