जात पाहुन चान्नी पोलिस करत आहेत पक्षपात.!
प्रतीनीधी अकोला
राज्यातील पोलीस यंत्रणा अजुनही जातीयवादाच्या छायेत अडकली असल्याचा गंभीर आरोप होत आहे.बौध्द समाजातील आरोपी वीरुध्द दखलपात्र व इतर समाजातील आरोपी वीरुध्द अदखलपात्र त्याच कलमाखाली नोंदवील्यामुळे पोलिस यंत्रणेवर संवीधानाचा प्रभाव पडतो की मनुस्पुतीचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सवीस्तर वुत्त असे की, पोलिस स्टेशन चान्नी या पातुर जी अकोला दीड ३१/०७/२५ रोजी fir संख्या २०७/२५ झाली असून ती भारतीय नागरिक सुरक्षा संहीतेचे कलम १७३ प्रमाणे दखलपात्र नोंदवण्यात आला यामध्ये भा. न. सु ३५१(२)व ३५१(३) प्रमाणे दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली त्याच प्रमाणे fir नं २०३/२३ मध्ये भा.द.वी कलम २९४व ५०६ प्रमाणे दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती या मधील दोन्ही आरोपी बौध्द समाजाचे आहेततर fir संख्या ३००/२५ यामध्ये कलम ३५२(२)व ३५२(३) प्रमाणे NCR अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे हा आरोपी बौध्द नसुन इतर समाजातील आहे.
भारताचे संविधान आर्टिकल १४(समतेचा अधीकार) आर्टिकल १७(अस्पृश्यता निवारण) व आर्टिकल २१ (जीवन स्वातंत्र्याचा हक्क ) यांचे हनन चान्नी पोलिसांनी केले आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता राहुल हातोले यांनी आपल्या उपवीभागीय पोलिस अधिकारी बाळापूर यांना तक्रार देवुन केला आहे मनुवादी विचाराने ग्रासलेल्या पक्षपाती पोलिसांवर अनुसूचित जाती जमाती प्रतीबंधक कायदा १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
समान गुन्ह्यात दोन भीन्न जातीच्या व्येक्तीवर दखलपात्र व दुसऱ्या जातीच्या व्येक्तीवर अदखलपात्र गुन्हे नोदवुन चक्क पोलिस यंत्रणेने भेदभाव केला आहे ज्यामुळे कायदा व संवीधान. दोन्ही चा अपमान केल्याचे मत राहुल हातोले यांनी व्यक्त केले या घटनेनं समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.स्थानीक स्वराज्य संस्था नी उच्च स्तरीय चौकशी ची मागणी करावी अशी मागणी होत आहेसवीधानाच्या शपथेवर काम करणाऱ्या पोलीस यंत्रणेकडून अशा जातीय भेदभावाची अपेक्षा नाही म्हणून हा प्रश्न समाजात गुंजु लागला आहे

