Thursday, February 26, 2026
Homeदौंडकुरकुंभ गाव मध्ये चिकनच्या दुकानात गांजाची विक्री एक किलो गांजा जप्त

कुरकुंभ गाव मध्ये चिकनच्या दुकानात गांजाची विक्री एक किलो गांजा जप्त

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड तालुक्यातील कुरकुम गावाच्या हद्दीत चिकन सेंटर विक्रीच्या व्यवसायात अवैधरीत्या गांजा विक्री करत असल्याचे 03/11/2025 रोजी पोलिसांना गोपनीय मार्फत माहिती समजली त्यानुसार की मौजे कुरकुंभ गावातील सलीम आदम शेख वय वर्षे 30 व्यवसाय चिकन सेंटर रा. कुरकुंभ तालुका दौंड जिल्हा पुणे हा इसम त्याची चिकन सेंटर दुकानांमध्ये अवैधरीत्या गांजाची विक्री करीत आहे त्याप्रमाणे पोलीस पथक असं रवाना होऊन सदर ठिकाणी छापा घातला असता त्याच्या जवळील एकूण 20725 रुपये किमतीचा एकूण 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला या बाबत पोलीस संजय कठावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पोलीस उपनिरीक्षक श्रीराग शिंदे, पोलीस हवालदार किरण पांढरे, अतुल पठाण, राऊत, विजय पवार, संजय कोठावळे, महेंद्र गायकवाड, आदींनी मिळून केली आहे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, श्रीरंग शिंदे, पुढील तपास करत आहे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments