Tuesday, September 29, 2026
Homeदौंडदौंडच्या डॉक्टरांची 46 लाखांची फसवणूक पुण्यातील डॉक्टर सह भावाच्या विरूद्ध गुन्हा दाखल

दौंडच्या डॉक्टरांची 46 लाखांची फसवणूक पुण्यातील डॉक्टर सह भावाच्या विरूद्ध गुन्हा दाखल

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड -येथील धक्कादायक प्रकार डॉक्टरांची एम डी मेडिसिन बनवण्याचे अमिष दाखवून तब्बल 46 लाखांची फसवणूक झाली पुण्यातील डॉक्टर सह यांचे भाऊ दोघाविरुद्ध दौंड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे दौंड येथील फिर्यादी संजीव केशव करंडे व्यवसाय डॉक्टर वय वर्ष 47 राहणार समतानगर यांना एम.डी मेडिसिन (पी जी) करण्यासाठी ॲडमिशन मिळून देतो असे सांगून डॉ. संजीव करंडे यांच्याकडून तब्बल 46 लाखांची फसवणूक झाली आहे डॉक्टर अक्षय देशमुख व त्यांचे भाऊ सागर देशमुख दोघे राहणार कात्रज पुणे या दोघांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे असे माहिती पोलीस हवालदार चव्हाण यांनी दिली डॉ. संजीव करंडे यांना एम डी मेडिसिन (पी जी) ॲडमिशन करून देण्या साठी 21/12/2024 ते 21/11/2025 कालावधी पासून दोघा भावांना मिळून डॉ. करंडे यांचा वेळोवेळी विश्वास संपादन करत वेळोवेळी रक्कम देण्यात आली होती सदरची रक्कम 46 लाख रुपये झाली होती आणि ते रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने याची खात्री झाली आपली आर्थिक फसवणूक झाली आहे फिर्यादी डॉ. संजीव करंडे यांनी डॉ. अक्षय देशमुख आणि त्यांचे भाऊ सागर देशमुख या दोघांच्या विरूद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो.स.ई उगले हे करीत आहेत

- Advertisment -

Most Popular

Recent Comments