दौंड:-दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ गोपळवाडी तालुका दौंड येथील रहिवासी नागरिक असून गेली३५ वर्षे सर्व परिसर व दौंड तालुक्यात शिव फुले शाहू आंबेडकर चळवळी साठी अहोरात्र जागृती करीत आहे.मी सन १९८३ते १९८५ व सन १९९१ ते १९९५ कालावधीत शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून काम केले आहे.पुणे जिल्हा साक्षरता मंचात शिक्षण व महिला सबलीकरणाचे काम केले आहे.तालुक्यात माजी. आमदार रमेश आप्पा थोरात,माजी. जि.प.सदस्य व दौंड शुगर चे संचालक वीरधवलबाबा जगदाळे,निर्मला ताई नागवडे, प्रवक्त्या राष्ट्र वादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते नंदू भाऊ पवार, तालुकाध्यक्ष नितीन जी दोरगे,शहर अध्यक्ष गुरुमुख नारंग, युवा अध्यक्ष निखिल स्वामी, व इंद्रजित जगदाळे, युवा नेते स्वप्नील भैया शहा, प्रा.डॉ.भीमराव मोरे,गोरख घोडके,विजयकुमार गायकवाड, आप्पा साहेब काळे,अशोकजी सुळ, खताळ पाटील, अण्णा शिंदे, व सर्व घटकांशी माझे मैत्रीचे संबंध आहेत.गोपाळवाडी कांनगाव जिल्हापरिषद विभाग अनुसूचित जाती पुरुष गटासाठी राखीव झाल्याने गोपाळवाडी.कांनगाव विभागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणुकीस उमेदवार म्हणून मी उभा राहू इच्छित आहे. दरेक गाव वाड्या वस्तीवर रस्ते,वीज पाणी मिळवून देणे.जिल्हा परिषद गटात बचत गटाचे जाळे विनुन त्या मार्फत नागरिकांना शासकीय योजना मिळवून देणे,महारष्ट्र शासन जिल्हा परिषद विभागात असणाऱ्या सर्व योजना गावात राबवून आर्थिक विकास साधणे,महिला व तरुणास नोकरी व्यवसायात मदत करणे, विद्यार्थी शाळा कॉलेज प्रवेशाचे प्रश्न मार्गी लावणे,प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांचा शैक्षणिक व भौतिक विकास साधने,शेतकरी व्ययक्तिक लाभाच्या योजना आमचे नेते राज्याचे कार्यक्षम उप मुख्यमंत्री मा.अजितदादा यांचे मार्गदर्शनाने नागरिकास मिळवून देणार आहे . आंबेडकरी संघटना, फुले शाहू आंबेडकर विचाराचे अनुयायी यांचा मला भक्कम पाठिंबा आहे.सर्व गावातील नागरिक व पदाधिकारी मला पाठिंबा देत आहेत. लवकरच उमेदवारी ची मागणी करणार आहे.जनतेने साथ द्यावी अशी माहिती बी. वा य.जगताप यांनी दिली

