मूकनायक तालुका प्रतिनिधी:- प्रशांत नरवाडे.
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दि08/01/2022 रोजी The Buddhist society of India तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष संदीप रणवीर सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि दिनेश हनुमंते (महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष) व वैभव धबडगे (महाराष्ट्र राज्य संघटक) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये औंढा तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली. त्यामध्ये नागसेन भीमराव नांगरे (तालुकाध्यक्ष ), लिंबाजी सोनबा काशीदे (कोषाध्यक्ष), मिलिंद प्रल्हाद सरोदे (तालुका महासचिव), संतोष हरी बगाटे (औंढा ता.उपाध्यक्ष), वसंतराव बाबाराव ढेंबरे, (ता.सचिव), रावसाहेब सोपानराव धवसे (औंढा ता.सहसचिव), तुकाराम सदाशिव काशीद (औंढा ता.संघटक), आनंद यशवंत खंदारे (संरक्षण विभाग प्रमुख), प्रकाश सिद्धबा बगाटे(ता.संस्कार विभाग), पंडित श्रीरंगराव नरवाडे (ता.प्रसिद्धीप्रमुख), मा.कमलाकर पांडुरंग श्रीखंडे (ता.संस्कार प्रमुख), मा.शिवाजी रामजी खिल्लारे ( ता.संघटक), राष्ट्रपाल उत्तमराव नांगरे (ता.संपर्क प्रमुख) अजय विश्वनाथ नांगरे
(ता.संघटक)भारतातील बौद्धांचे नेतृत्व आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशभरात दी बुद्धिस्ट सोसायटी आॕफ इंडिया चे कार्य ज्या गतीने चालू आहे. अग्दी तीच गती हिंगोली जिल्ह्यात देखील पाहण्यास मिळत आहे. हिंगोली जिल्हाध्यक्ष संदीप रणवीर सर आणि त्यांचे सहकारी अग्दी तल्लीनतेने जिल्ह्यात कार्य करताना दिसत आहेत. औंढा तालुक्यात हे कार्य अधिक गतीने करण्यासाठी तालुकाव्यापी कमिटी ची निवड करण्यात आली. तसेच यावेळी जागतीक धम्मध्वज दिन देखील साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुर्वातीस महामानवांस अभिवादन करुन, त्रिशरण-पंचशिल घेण्यात आले. त्या नंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष अॕड.रामजी कांबळे, वसमत उपविभाग प्रमुख काशिनाथ खाडे, जि.प्रसिद्धी प्रमुख गौतम खिल्लारे यांनी संघटनेच्या उद्देश व कार्य बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिनाजी खाडे यांनी , प्रास्तविक साहेबराव काशिदे तर आभार संभाजी मोगले यांनी मानले.

