मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच.गायकवाड (पिंपरी चिंचवड)
दि.06 जानेवारी ; साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत नाकारल्या मुळे संपूर्ण राज्यात त्याचे संतप्त पडसाद उमटले व राज्यभर केन्द्र सरकारच्या विरोधात, आंदोलने व निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आज दि 05 जानेवारी रोजी पिंपरी तील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर ( भीमशृष्टी ) याठिकाणी पिंपरी चिंचवड येथील समस्त मातंग समाजाच्या वतीने जेष्ठ नेते संदीपान झोंबडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचा जाहीर निषेध करण्यात आला. व सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन चे संचालक विकास त्रिवेदी यांचा देखील जाहीर निषेध करण्यात आला.
अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नाहीत, म्हणून त्यांचा महापुरुषांच्या यादीत नावं समाविष्ट करण्यात आले नाही. या विकास त्रिवेदी यांनी लावलेल्या नवीन जावई शोधाचा समाचार देखील समस्त मातंग समाजाच्या वतीने घेण्यात आला. व तात्काळ अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या व प्रबोधनकारांच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी या आंदोलनात प्रामुख्याने जेष्ठ नेते संदीपान झोंबडे, सर्वश्री भगवान शिंदे, प्रल्हाद कांबळे, नाना कसबे, संजय ससाणे, गणेश अडागळे, राजू आवळे, संदीप जाधव, दत्तू चव्हाण, विशाल कसबे, अण्णा कसबे, गणेश साठे, दादाभाउ अल्लाट, आबा भवाळ,हनुमंत वाघमारे, सतीश कांबळे, नितीन घोलप, मीनाताई कांबळे, मालन ताई गायकवाड, नंदाताई कांबळे, मारुती दाखले, अक्षय दुनघाव,आकाश शिंदे, प्रा. बी बी शिंदे, धुराजी शिंदे, उमेश हानवते,सतीश भवाळ,विठ्ठल शिंदे, कल्पना कांबळे, चांदणी सरवदे, वैशाली कांबळे, अंजना जगताप, दशरथ कांबळे, कैलास कसबे, दीपक लोखंडे, बाळासाहेब खंदारे, विकास चव्हाण, कोमल शिंदे, रमेश शिंदे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

