बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी (रघुनाथ गवई)
बुलढाणा, दि.२६ :जिल्ह्यातील किन्ही सवडत येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने लॉर्ड बुद्ध नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोप पार पडला.
पूज्य भंते जय रत्न बोधी जालना. पूज्य भंते श्रद्धानंद जी बुलढाणा यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलाच्या वतीने ध्वज सलामी देण्यात आली .व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची, गावातून धम्म रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन रमाई नगर येथील समाज मंदिरात समोर पूज्य भंते जय रत्न बोधी. जालना. भंते श्रद्धा नंदजी बोधी. बुलढाणा यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष पी .बि. इंगोले अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख अतिथी म्हणून देविदास बोर्डे जिल्हा संघटक बुलढाणा जिल्हा बि.ओ.मा. सदाशिव खिल्लारे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष. दीपक भाऊ कस्तुरे चिखली तालुका सरचिटणीस. हिम्मतराव कांबळे तालुका कोषाध्यक्ष. सखाराम भाऊ वानखडे तालुका सरचिटणीस शंकर भाऊ जाधव सर चिखली शहराध्यक्ष. शेषराव भाऊ हिवाळे चिखली तालुका संरक्षण सचिव .भाई प्रदीप अंभोरे. माजी सरपंच उदयनगर हे होते
त्यावेळी संजय धुरंधर बौद्धाचार्य तथा तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. ग्रंथवाचक जयपाल वानखेडे सामाजिक कार्यकर्ते. गजानन धुरंधर ज्येष्ठ नेते शिवाजी धुरंधर मोतीराम धुरंधर प्रकाश धुरंधर उदयभान सावंग. ह .भ .प. मुरलीधर महाराज हेलगे. ह. भ. प . भुजंगरावभाऊ सवडकर.गौतम गवार गुरु. मिलिंद मिसाळ कोलारा येथील समता सैनिक दल खंडारे साहेब शाम धुरंधर इत्यादी उपस्थित होते हि रात्र शाहिरांची या कार्यक्रमासाठी अभिमन्यू भाऊ अंभोरे .
गायक शिवाजी भाऊ लहाने राजूभाऊ हिवराळे ढोलक वादक शाहीर प्रभू डोके रिधम वादक शाहीर अरुण सरदार. दीपक इंचाळ ढोल वादक. विलास गवार गुरु विश्वनाथ घेवंदे. शाहीर शिवाजीराव पवार गवई सर. चिखली. तथा सर्व उपासक उपासिका व गावकरी मंडळी ग्रंथ समारंभामध्ये उपस्थित होते.

