मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पुणे)
दि, 05 जानेवारी, पुणे : अनाथांची माय जेष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांच पुण्यात निधन झाले आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज दि 04 रोजी संध्याकाळी सव्वा आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सिंधुताईना लोक प्रेमाने माई म्हणत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचे काही दिवसांपूर्वी हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर पुन्हां एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

