26 आक्टोंबर रोजी भंन्ते यश थेरो श्रीलंका यांच्या नियोजन खाली समारंभ उपासक उपासिकांनी उपस्थित राहाण्याचे आव्हान
बुलडाणा,(प्रतिनिधी)- रघुनाथ गवई
26 ऑक्टोबर 2025 रोजी भंते यश थेरो श्रीलंका यांच्या नियोजनाखाली पुज्य भंत्ते गुरू भन्ते जी यांच्या प्रेरणेतून पुज्यनिय भिक्खू संघ पू.भंन्ते उदितज्ञानथेरो, पू. भन्ते उपाली थेरो, पु.भंन्ते ज्ञानरक्षीत थेरो, पु. भंन्ते विवेक थेरो, पु.भंत्ते शांन्तीवित थेरो, पू.धम्मसेन थेरो, पू.भंन्ते निरोध पु.भंन्ते गुणान्नद अभिभू, पू.भंन्ते पूण्ण, पू. भंन्ते लिपी शिवली, पू.भंन्ते परमानन्द, पू.रटूपाल तसेच प्रविज्जित सर्वश्री श्रामनेर गण शिरामनेर आनन्द, सुभाहू,वंगीत,उत्तर, इंदसार,रेवत,विमल, धम्मधर यांचे उपस्थितीत दि. 26 आक्टोंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता आराध्या लॉन चिखली रोड बुलडाणा येथे कठिण चिवरदान निमित्ताने सकाळपासून धम्म संस्कृती नुसार धम्म देसनेसह भरगच्च मंगलमय कार्यक्रमाची सकाळ पासुन रेलचेल.
तथागतांचा तत्कालीन उपासक वैद्य जिवक यांनी तथागतांना सर्वात प्रथम चिवर दिल्याची नोंद सुवर्णाक्षराने लिहिल्या गेली आहे. तसेच प्रजापती माता गौतमी यांनीही कपिल वस्तू येथील प्रथम वर्षावासादरम्यान भगवंतांना कठीण चिवर दान करताना तीन महिने सर्व शिलांचे काटेकोरपणे पालन करून, दान परमिता करताना चित्त हे अतिशय मंगलमय आणि सम्यक ठेऊन केले होते. अश्या प्रकारे कठीण चिवरदान चे पुण्य, सर्व उपासक – उपासिकांना मिळू शकते, कठीण चिवर दान चा उद्देश हा वर्षावासामधील भिक्खूंनी धम्मदेशना दिल्या बद्दल भिक्खू संघाच्या वतीने केलेला कार्य गौरव आहे. केवळ संपूर्ण वर्षभरातून एकदाच वर्षावास झाल्यावर करण्यात येत असल्यामुळे पुण्यसंचय करण्यासाठी उपासक-उपासिकांही संधी प्राप्त होणार असते. अश्या वेळी सात्विक प्रसन्न मनाने चित्ताने आणि शील पालन चा संकल्प करूनच सर्व प्रकारचे धम्मदान करावे. तरच पुण्यसंचय प्राप्त होतो.
तत्कालीन इतिहासामध्ये तथागतांना प्रजापती माता गौतमी यांनी कठीण चिवरदान देण्याच्या सुद्धा नोंदी आहेत. हा विधी सामूहिक रित्याच करण्यात येत असल्याने भिखू संघ द्वारे कठीण चिवर दान केल्या जात होते.हा सामूहिक विधी कुशल कर्म करणारे उपासक आणि उपासिका पुण्य संचय करू शकत होते.कठीण चिवर दान हे स्वतः कापड तयार करून , विशिष्ठ रंग देऊन ठराविक कालावधी मधेच चिवर तयार करीत असत. कठीण चिवर दान समयी सम्यक, आनंद दायी चित्त ने दान केले जात होते. एका चिवर साठी लागणारे कापड हे किमान 10 मिटर पर्यंत होते. अश्या उज्ज्वल परंपरेचे अनुकरण म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील धम्म बांधवांच्या वतीने,पूज्य गुरु भंते यांच्या प्रेरणेने आणि पूज्य भंते यश थेरो श्रीलंका यांच्या उत्कृष्ट आयोजनाखाली पूजनीय भिक्खू संघास मंगलमय कठीण चिवरदान समारंभ बुध्द रश्मि महाविहार बुलढाण्याच्या वतीने कठीण चिवर दान समारोह होत आहे.
या कठीण चिवरदान समारोहास बुलडाणा जिल्ह्यातील बौध्द उपासक उपासिकांनी पांढरे वस्र परिधान करून तनमन धनाने या कठीण चिवर दान, आणि सर्व प्रकारचे दान समारोहास दानपरमीता करावी व पूण्य प्राप्त करावे.

