मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धनसोलापूर गांधीनगर, दि.२० ऑक्टोबर.
बुद्धवाणी ‘पाली’ भाषेच्या धम्म प्रचार प्रसार संकल्पातील ‘धम्मसंडे संस्कार स्कुल’ चे ‘भीमशक्ती सामाजिक बहुउद्देशिय सेवा मंडळ’ संचालित उद्गाटन सोहळा आज सोलापूर गांधीनगरमध्ये संपन्न झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पाली भाषा आजी माजी विध्यार्थी तसेंच डॉ. कीर्तीपाल गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पाली भाषा सहाय्यक प्राध्यापक आयु. विजयकुमार झुंबरे यांनी उदघाट्न केले… तत्पूर्वी, “यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य” राज्य उपाध्यक्ष एक्स. आर्मी आयु. शिवपुत्र घटकांबळे यांचे नेतृत्वात धम्मध्वजास आर्मीबिगुलसह, ‘धम्मध्वज गाथा’ पठणाने मानवंदना देण्यात आली.
त्रिसरण पंचशील धम्म गाथेनें अवघे गांधीनगर धम्ममय झाले…भिमशक्ती सामाजिक बहुउद्देशीय सेवा मंडळ आणि यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन शाखा गांधीनगर सोलापूरचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते…तसेंच सामाजिक कार्यकर्ते गौतम बनसोडे, राहुल वाघमारे, उमाकांत तुपसाखरे, अशोक कांबळे,आकाश कांबळे,करण कांबळे यां तरुण युवकांनी यां ‘धम्म संडे संस्कार स्कुल’द्वारे समस्त गांधीनगर वासियांना बुद्धवाणी पाली भाषेच्या ज्ञानविहार केंद्रची उत्साहात सुरुवात केली.
समस्त गांधीनगरचे बौद्ध उपासक – उपासिका, भिमशक्ती सामाजिक बहुउद्देशीय सेवा मंडळा चे सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात यां ‘धम्म संडे संस्कार स्कुल’च्या उदघाट्न सोहळ्यात उपस्थिती दर्शविली होती…
सामुदायिक सरणतय गाथा पठनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

