मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं चिं )
पिंपरी, दि.03 जानेवारी, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी यांच्या वतीने आज पिंपरी येथील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक परिसर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास धुराजी शिंदे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड रिपब्लिकन सेना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी
मुकुंद रणपिसे कार्याध्यक्ष रिपब्लिकन सेना ,दत्ता गायकवाड महासचिव, छत्रपती मस्के सचिव, रमेश कांबळे, गौतम साळवे, कांचन जावळे, गिरीश सोनवणे, विशाल कांबळे, हरिभाऊ गायकवाड, अशोक जावळे, नारायण मस्के इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

