Thursday, February 26, 2026
HomeUncategorizedस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार:-संजय धुरंधर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार:-संजय धुरंधर

जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगर परिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने स्वबळावर लढणार असल्याची माहिती चिखली तालुका अध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान १६ आक्टोंबर रोजी दुपारी १२.००वाजता विश्राम गृह चिखली येथे बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते त्यावेळी ते पुढे म्हणाले की गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित चा मतदार काही प्रमाणात कॉग्रेसकडे वळला होता परंतु त्याच मतदारांचा विश्वास घात झाला सेक्युलर विचारांचे त्यांचे कार्यकर्ते आतुन भाजपा सोबत गेल्यानं ह्यामुळे या मतदाराचा भ्रमनिरास झाला म्हणून आता हा मतदार परत. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी कडे आकर्षित झाला आहे . एकेकाळी दोन नंबरवर राहणारा भा.री.प. बहुजन महासंघ आज वंचित घ्या रुपाने उभारताना दिसत आहे .
म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात शासकीय विश्रामगृह चिखली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक लेव्हलवर भाजप मित्र पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत सन्मानपूर्वक युती करण्यास तयार परंतु आम्हाला सन्मान पुर्वक जर काही होत नसेल तर वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्यास सक्षम आहे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी सुद्धा मागितली आहे. सदर बैठकीत महत्वाचे मुद्यावर चर्चा करण्यात आली. चिखली शहरातील प्रेत्येक प्रभागात वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवार रिंगणात उतरणार आहे. व प्रेत्येक जि. प. पं. स.सर्कलमध्ये सुद्धा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली यावेळी ता अध्यक्ष .संजय धुरंधर.उपाध्यक्ष शिवाजी गाडे. शहराध्यक्ष बाळू भिसे अँड. सतीश भाऊ गवई. ता. सं.प्रा.प्रवीण खरात. ता. सचिव.जितु निकाळजे ता. उ.अक्षय जाधव ता. जिल्हा सदस्य.विद्याधर गवई मनोहर भाऊ घेंवदे. ता. उ. मा. वासुदेव वानखडे ज्येष्ठ नेते.मा. गजानन भाऊ धुरंधर ज्येष्ठ नेते. मा.रमेश भाऊ गवई ता. उ. अँड .विजय वानखडे.सौ. मालताताई निकाळजे ज्येष्ठ नेत्या. राजेश खंडारे. निलेश सुभाष जाधव .रोहित पेंढारकर. .मुकुंदा भाऊ खरात.गुलाबराव साळवे. आकाश महाजन .गौतम साळवे मा. व्ही .पी. पवार साहेब इतर सर्व वंचित बहुजन आघाडी चिखलीचे पदाधिकारी उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments