Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडन्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

न्यू सिटीप्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं चिं )

पिंपरी, दि:03 जानेवारी, रहाटणी येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोशल डिस्टन्स पाळून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्यध्यापिका आसावरी घोडके, युवराज प्रगणे, सचिन काळसाईत,तसेच शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
राष्ट्रपिता ज्योतीबा फुले सारख्या महावृक्षाच्या सावलीत सावित्रीमाइंची वाढ खुंटली नाही, उलट अधिक बहरली. स्रीने ठरविले तर तिच्या साठी अशक्य काहीच नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीमाई फुले होय. सावित्रीमाई धाडसाच्या पर्वत होत्या. त्यांनी राष्ट्रपिता ज्योतीबा फुले यांच्या निधनानंतर देखील आपले सत्यशोधक समाजाचे कार्य
आपल्या अंतापर्यंत सुरू ठेवले.
आयुष्यातील सर्व संकटाना त्यांनी
निर्धाराने हरविले आहे. सावित्रीमाईच्या त्यागाची महिलांनी जाण ठेवावी. असे अरुण चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.
यावेळी तन्मय इंगळे व देवयानी काटे यांनी सूत्रसंचालन केले व प्रीती गुप्ता यांनी आभार व्यक्त केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments