वसमत: प्रतिनिधी आळणे मिलिंद
वसमत: कन्हेरगाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरगाव येथे सर्वप्रथम कर्मवीर दादासाहेब गायकवाड व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका पवार एस डी ह्या होत्या. प्रमुख पाहुणे मिलिंद आळणे व गुरुनाथ गाडेकर समतादूत बार्टी हे होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना खिंडरे आर. एस. या मॅडमनी केली.दादासाहेब गायकवाड यांचे पूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1902 रोजी झाला. ते समाजसेवक, राजकीय कार्यकर्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी होते.ते 29 डिसेंबर 1971 रोजी निधन पावले. दर वर्षी “कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार” असे एक पुरस्कार महाराष्ट्र शासनाद्वारे त्यांना समर्पित केलेला आहे. सामाजिक न्याय विभाग त्यांच्या जयंती कार्यक्रमात त्यांचा कार्य प्रेरणादायी म्हणून मानले गेले होते..
डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्यांच्या जयंतीच्या दिवशी (15 ऑक्टोबर)विश्व छात्र दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यांच्या शिक्षण आणि विज्ञानासाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ शाळा मध्ये त्यांच्या जीवनाच्या आदर्शांवर प्रकाश टाकणात आला.त्यांना “मिसाइल मैन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आभार प्रदर्शन सांगळे एम पी मॅडम नी केले.

