मूकनायक/ राजरत्न जाधव
ठाणे प्रतिनिधि
ठाणे /महाराष्ट्र
नुकताच 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दिनी सर्व देशभर धमचक्र प्रवर्तन दिनाचा आनंदाचा सोहळा जल्लोषात साजरा झाला. हा सोहळा साजरा होत असतांना. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा भिवंडी तालुक्यातील चावे ह्या गावी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याच्या निमित्ताने चौकात लावलेल्या शोभा बॅनर वर जातीय मानसिकतेने बरबटलेल्या एका गलिच्छ घाणेरड्या जातीवादी – धर्मांधवादी मानवी बिनडोक किड्याने अज्ञात इसमाने महापुरुषांच्या प्रतिमा शोभा बॅनर वर कुणी आजूबाजूला नसल्याचा फायदा घेत बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर चिखल फेकून. गपचूप ढुंगणाला पाय लावून भटक्या कुत्र्याप्रमाणे पसारा झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील चावे गावातील नाक्यावर झाली. ही घटना घडण्यामागे त्या चिखलफेक करणाऱ्या युवकांची मनुवादी विचारसरणी विषा प्रमाणे बाहेर आल्याची चर्चा स्थानिक नागरिक तसेच चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आहे. ह्या घटनेनंतर आंबेडकरी बहुजन चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तेथील ग्रामपंचायतीला घेराव घालत तेथील CCTV प्रक्षेपण तपासणी साठी प्रशासनाकडे चौकशी साठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. परंतु ग्रामसेवक हे CCTV प्रक्षेपण बंद पडल्याचे सांगून जाणीवपूर्वक ह्या घटनेला दाबण्याचे प्रयत्न करत आहेत. आंबेडकरी चळवळीचे वैचारिक जेष्ठ व झंजावती कार्यकर्ते ऍडवोकेट किरण चन्ने साहेब ह्यांनी तीव्र आंदोलन करून सदरील नीच मानसिकतेच्या षंड युवकांना शोधण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे कायदेशीर रित्या कार्यवाही चालू केली आहे. तसेच चावे गावातील ग्रामसेवक ह्यानी CCTV प्रक्षेपणाची फीत ना देऊन गुन्हेगारांना वाचवण्याचा व प्रशासन कार्यात भाबलटपणा दाखवण्याच्या पद्धतीवरून ग्रामसेवक ह्याच्या निलंबणाची मागणी स्थानिक चळवळीचे नेते किरण चन्ने साहेब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा स्तरीय नेते भाईदास जी जाधव व रंजना भोईर, ऍड बाळाराम सोनावणे तसेच स्थानिक युवक नागरिकांकडून केली जात आहे.सध्या देशात भाजप चे सरकार आल्यापासून जातीय व धार्मिक राजकारण कायद्याच्या चौकटीत गेल्याने आज ते एवढे फोफावले आहे की कोणतेही राजकारण किंवा सामाजिक समस्या निर्माण करावयाची असली की राष्ट्रपुरुषांच्या संवेदनशील कार्यक्रम अथवा त्यांच्या प्रतिमांना टार्गेट केलं जातं आणि ही मनुवादी धार्मिक राजकारणाची विचारसरणी राष्ट्रीय, सामाजिक तेढ व असंतोषाला कारणीभूत ठरत आहे.

