Thursday, February 26, 2026
Homeदौंडभारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका शाखेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिवस आनंदी उत्सवात...

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका शाखेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिवस आनंदी उत्सवात साजरा

मूकनायक प्रतिनिधी:विजय बगाडे

दौंड -बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बुद्ध धर्मात प्रवेश केला म्हणून हा दिवस भारतात धम्मचक्र परिवर्तन दिन हा साजरा केला जाणारा महत्त्वाचा उत्सव आहे

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका शाखेच्या वतीने दिनांक २ ऑक्टोबर रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच राजगृह बुद्ध विहार येथे लाईट डेकोरेशन व फुलांची सुंदर अशी सजावट केली होती सकाळी प्रथम सामुदायिक धम्मवंदन घेण्यात आली व राजगृह बुद्ध विहार पासून ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती सर्व उपासक व उपासिका रॅलीमध्ये सहभागी झाले होते सर्वांनी हातामध्ये पंचशील ध्वज घेऊन घोषणा देण्यात आल्या रॅली व बुध्द विहाराचे नियोजन राजगृह बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयु. राजेश मंथने व त्यांचे सहकार्य यांनी केले होते तसेच भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका शाखेचे अधिकारी पदाधिकारी व बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते व त्यावेळी आयु. श्रीकांत साळवे आयु.जयदीप बगाडे आयु.राजू गायकवाड आयु नरेश डाळिंबे आयु. पिंटू डाळिंबे आयु. दिलीप पगारे आयु. आयु.बाळकुंद्री सर आयु.कोकाटे सर आयु.विकास कदम सभापती आयु. जगदीश सिद्धभाने व आयु.गौतम भालेराव हे पदाधिकारी उपस्थितीत होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments