मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पिं चिं)
दि.25 डिसेंबर : देहूरोड येथे हजारो बौध्द अनुयायीनी आज दि.25 डिसेंबर रोजी धम्मभूमी देहूरोड या ठिकाणी सामूहिक बुद्धवंदणेचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
25 डिसेंबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहूरोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर ला धम्मभूमी देहूरोड येथे हजारो बौध्द अनुयायी एकत्र जमतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बौध्द अनुयायी नी एकत्र येत सामूहिक बुद्ध वंदणेचा कार्यक्रम साजरा केला.
देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर सकाळी संपूर्ण देशभरातून हजारो बौध्द अनुयायी एकत्र आले होते. व देहूरोड येथील धम्मपीठावर शेकडो बौध्द भिक्खु आले होते.
बुद्ध काळाच्या प्रभावाने नंतर सुमारे बाराशे वर्षानंतर पुन्हा एकदा
भारतभूमीत बुद्धाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेले देहूरोड येथील हे बुद्ध विहार अद्वितीय ठरलेले आहे.

