मूकनायक प्रतिनिधी:विजय बगाडे
दौंड -आज दिनांक 29/9/2025 रोजी पहाटे 04/30 वाजण्याची सुमारास कुरकुंभ एम.आय.डी.सी येथील अल्कली अमाईन कंपनीचे जवळ काही चोर चंदनाच्या झाडाची तोड करून चोरून नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळतच सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकला असताना ५ आरोपी पळून जाताना पोलीस पथकाने अंधारात त्याचा पाठलाग करून त्यापैकी ४ आरोपी ताब्यात घेतले असून त्यांचे नाव या प्रमाणे १) नितीन संजय माने वय ३८ वर्ष रा. नीरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे २) भाऊसाहेब गोरख जाधव वय २७ वर्ष देलवडी तालुका दौंड जिल्हा पुणे ३) लहू तानाजी जाधव वय ३६ वर्ष राहणार दापोडी तालुका दौंड जिल्हा पुणे ४) अनिल अशोक माने वय 40 वर्ष राहणार केडगाव चौफुला तालुका दौंड जिल्हा पुणे हे चोर चंदनाच्या लाकडासह मिळून आले असून त्यांचा साथीदार ५) दिगंबर बलाशा काळे वय ४० वर्षे रा. वाखरी चौफुलाजवळ तालुका दौंड जिल्हा पुणे ( फरारी) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे वरील 4 चोरट्यांच्या ताब्यातून एकूण 180 किलो चंदनाचे 9 चंदनाची लाकडे त्याची एकूण किंमत 1,80,000 /- रुपये व चंदनाचे झाड तोडण्यासाठी लागणारे साधन मिळून आलेले आहे. या बाबत संजय कोठावळे यांनी फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशन गुन्हा BNS 303(२)’३२९,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण ढुके करीत आहेत सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस हवालदार पठाण पोलीस हवालदार सागर म्हेत्रे पोलीस हवालदार किरण पांढरे, संजय कोठावळे, निखिल जाधव अमीर शेख यांनी केली आहे

