संभाजीनगर : भारतमातेच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर,पराक्रमी सैनिकांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या शौर्यगाथेला सलाम करण्यासाठी बुधवारी,०१ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजता MIT इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपत्री संभाजीनगर (औरंगाबाद) येथे “शहीद स्मृती अभिवादन” कार्यक्रम व “महार रेजिमेंटचा ८५ वा स्थापना दिन” सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. ज्या सैनिकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता देशाचे संरक्षणार्थ बलिदान दिले अशा शहीद सैनिकांना अभिवादन करून नवतरुण पिढीला देशभक्ती व शहीद सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण होण्याकरीता, “यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य” या “महार रेजिमेंट” च्या माजी सैनिकांच्या राज्यस्तरीय रजिस्टर्ड संघटनेने हा अभिवादन सोहळा आयोजित केला आहे.
या सोहळ्यात 1962 ,1965, 1971 व 1999 च्या युद्धातील जिवीत जेष्ठ सैनिकांचा सन्मान व सत्कार आयोजित केला आहे. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांना तसेच विरमाता, विरपत्नी व विरपालकांचा “विशेष सन्मान” होणार आहे. या शहिदस्मृती अभिवादन आणि स्थापना दिवसाच्या सोहळ्याची सुरुवात बुधवारी, दि.०१आक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशव्दाराजवळील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आजीमाजी सैनिकांव्दारे सैनिकी ड्रेसकोडमध्ये ‘बिगुलध्वनी’ सह मानवंदना देवून कार-बाईक रॅलीमध्ये 1971 युद्धातील अदम्य साहस व पराक्रमी विरचक्र प्राप्त युद्धविर ‘कचरू साळवे’ साहेबांना व ईतर युद्धविरांना ‘ओपन जीप’मध्ये रॅली पथ संचालनासह आयोजित संमारंभ स्थळी “शहीद स्तंभ” प्रतिकृतीस ‘रिथलिंग परेड’व्दारे सैनिकी मानवंदना देण्यात येणार आहे. तदनंतर “MIT मंथन हॉल” मध्ये मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण महार रेजिमेंटचे कर्नल ऑफ दि रेजिमेंट लेफ्टनंट जनरल संदीप जैन AVSM, SM तसेच महार रेजिमेंट सेंटर कमांडंट साहेबांची विषेश उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी श्री. हितेन वेणेगावकर, न्यायाधिश उच्च न्यायालय, मा.श्री. दिलीप स्वामी (IAS) जिल्हाधिकारी छ. संभाजीनगर, मा.श्री. जी.श्रीकांत (IAS), आयुक्त मनपा छ. संभाजीनगर, मा.श्री. प्रवीण पवार (IAS) पोलीस आयुक्त छ. संभाजीनगर, डॉ. वाल्मिक सरोदे- कुलगुरू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर, मा. श्री. विक्रम साळी – कंमाडिंग ऑफीसर SRPF, मार्गदर्शक कर्नल नंदकिशोर खडसे (सेना मेडल) कंमाडिंग ऑफीसर आर्टिलरी रेजिमेंट, कर्नल निर्देश शहॉ कमांडिंग ऑफीसर 136 महार TA बटालियन, डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य मिलंद कॉलेज ऑफ आर्ट्स तसेच कॅप्टन देविंदर खुराणा या इंडियन आर्मीच्या दिग्गजांची उपस्थितीं लाभणार आहे.
या संपुर्ण सोहळ्याचे ‘Live Telecast’ लॉर्ड बुद्धा व आवाज ईंडिया टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे, ज्यामुळे हजारो सैनिक परिवार या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत…
हा सोहळा कॅप्टन बाजीराव सोनुने साहेबांच्या उपस्थितीत होणार असून, तत्पूर्वी गेल्या दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी “यश सिद्धी असोसीएशन” चे अध्यक्ष सुभेदार, मेजर प्रदीप गायकवाड, राज्य सचिव कैलास खिल्लारे , अकोला विभागीय अध्यक्ष सुभेदार विष्णु डोंगरे व सुभेदार मेजर,कॅप्टन आनंद वाघमारे साहेब यांनी “MRC सागर”ला भेट देवून सैनिकांचे पेन्शनसंबंधी समस्या दूर करण्यासाठी रेकॉर्ड्स क्लार्क व स्पर्श टिम पाठवण्याबाबत डिप्टी कंमाडंट कर्नल अदित्य जोशी साहेबांना विनंती केली होती ती मंजुर करण्यात आली आहे. तसेंच मंगळवारी दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी सैनिकांचे नातेसंबंध जुडावे या उद्देशाने सैनिकांच्या तरुण मुला-मुलींचे ‘वधुवर परिचय मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. तरी, ज्या सैनिकांना पेन्शनसंबंधी किंवा ईतर समस्या असेल त्यांनी आपले Army Documents सोबत आणावेत.
“यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य”, छ. संभाजीनगर ची विद्यमान कार्यकारिणी शाखा सक्रिय योगदान देत असून, शौर्य व देशभक्तीचा संदेश पिढ्यानंपिढ्या पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सैनिकी शौर्य, बलिदान आणि आत्मसन्मानाचा उत्सव म्हणजेच “०१ ऑक्टोबर महार रेजिमेंटचा स्थापना दिन आहे!” या कार्यक्रमास महाराष्ट्रातील जास्तीत जास्त सैनिकांनी आपल्या परिवारासह बुधवारी ०१ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन “यश सिद्धी बहुउद्देशिय असोसिएशन” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. शिवपुत्र घटकांबळे संपर्क +91 99674 37609 यांनी महाराष्ट्रातील रेजिमेंटच्या आजीमाजी शूरवीर सैनिकीं परिवारांना केले आहें.

