Thursday, February 26, 2026
Homeदौंडभिक्खुनी संघ स्थापून भगवान बुद्धाने स्रीयांना स्वातंत्र्य बहाल केले ...

भिक्खुनी संघ स्थापून भगवान बुद्धाने स्रीयांना स्वातंत्र्य बहाल केले – आयु.श्रीकृष्ण मोरे

मूकनायक प्रतिनिधी:विजय बगाडे

दौंड.दिनांक २२.९. २०२५इसवी सन २५०० वर्षापासून ज्ञान आणि विज्ञान या पासून दूर असलेल्या स्री याना प्रथम महा महाप्रजापती गौतमी यांना धम्मदीक्षा देवून तथागत भगवान बुद्धांनी ८४००० स्कदा्न्ची शिकवण दिली व स्री यांना स्वातंत्र्य ब हाल केले असे विचार आयु श्रीकृष्ण मोरे केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा दौंड यांनी व्यक्त केले.आयु.दिलीप उमाजी आढाव यांचे निवासस्थानी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी जागर महामातांचा या कार्य क्रमात ते बोलत होते. महप्रजापती गौतमी या मातेने सिद्धार्थ यांची आई महामाया यांचे निधन झाले नंतर आईप्रमाणे संगोपण, शिक्षण शाक्य संघाचा सरसेनापती म्हणून जबाबदारी, यशोधरेशी विवाह,सिद्धार्थाचा गृह त्यागा नंतर यशोधरा राहुल व शुद्धोधन यांचे पालनपोषण, व शेवटी तथागतांचे भिखूनी संघातील अतुलनीय कार्य म्हणजे भारतीय श्रियांची गौरव गाथा च होय,असे ते म्हणाले.अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ.भीमराव मोरे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर हे होते.धम्म वंद्ना आयु.श्रीधर बलेकुंद्री यांनी घेतली.प्रास्ताविक आयु.विजयकुमार गायकवाड यांनी केले,या विषयावर आयु. बी. वाय. जगताप,श्रीधर बाळे कुंद्री,प्रा डॉ.भीमराव मोरे यांनी विचार मांडले, आभार दिलीप आढाव, यांनी मानले.या कार्यक्रमास व्ही.एल.कदम,चंद्रकांत कदम,उमाजी आढाव,गोरख घोडके,जयराम सोनवणे,सतीश डाळिंबे,सूर्यकांत कांबळे,निलेश कदम,सूर्यकांत जानराव ,राहुल झेंडे, आयुष्यमान गरुड आयुष्यं मती सारिका आढाव, संबोधी आढाव,सुमेध आढाव, मंदा काकडे, उपासक उपासिका व इत्यादी मान्यवर हजर होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments